विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगण विकास हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मूळ उद्देश; चंद्रसेन माने-पाटील

जतवार्ता न्यूज नेटवर्क; राष्ट्रीय सेवा योजनेमुळे आत्मविश्वास वाढीस लागून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मूळ गाभा आहे, असे प्रतिपादन माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.चंद्रसेन मानेपाटील यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात "राष्ट्रीय सेवा योजना व आजचा युवक" या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव करेनव्वर हे होते. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ.पुंडलिक चौधरी, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका महेजबीन मुजावर, व प्रकल्प अधिकारी प्रा.सोमनाथ गायकवाड उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पुंडलिक चौधरी यांनी आपल्या प्रस्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे महत्त्व सांगून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी बोलताना चंद्रसेन मानेपाटील पुढे म्हणाले की, काळानुसार व्यक्तिमत्वामध्ये, विचारांमध्ये बदल होत असतो. हा बदल स्वीक...