श्री.अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्यावतीने नवरात्रीच्या नियोजनाची जोरदार तयारी

नवरात्रीनिमित्त नवचंडी होमासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; अध्यक्ष शहाजीबापू भोसले यांची माहीती


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    श्री.अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्यावतीने दर तीन वर्षानी श्री.अंबिका देवालय जत या ठिकाणी नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी करण्यात येणा-या या होमास भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मंडळाचे अध्यक्ष श्री.शहाजीबापू भोसले यांनी आवाहन केले आहे. दि.२२ सप्टेंबर २०२५ पासून नवरात्र उत्सवास सुरूवात होणार असून त्या पाश्र्वभूमीवर श्री.अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्यावतीने जत वाचनालय जत याठिकाणी मंडळाची वार्षीक बैठक मंडळाचे अध्यक्ष श्री.शहाजीबापू भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या वेळी श्री.पांडुरंग कटरेसर, श्री.बसू चौगुले, सुधिरदादा चव्हाण, यशवंत शिंदे,मनोहर गायकवाड, तानाजी यादव,बाळासाहेब हुंचाळकर, अजित शिंदे, अनिल देशपांडे, अनिल शिंदे,धर्मराज माने,पुंडलिक पांढरे,भारत गायकवाड आदीसह मंडळाचे सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
    यावेळी श्री.अंबिका नवरात्र उत्सव मंडळ  यांच्याकडून श्री.अंबाबाई मंदिराची रंगरंगोटी करणे,मंदिर फुलानी  सुशोभित करणे, मंदिरात व दर्शन रांग येथे विध्दूत रोषणाई करणे.  मंडळाच्यावतीने जत वाचनालय चौकात स्वागत कमान उभी करणे,महिला मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत करणे,भक्तीगीत कार्यक्रम ठेवणे,ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील बालकिर्तनकार ह.भ.प.कु.राजनंदीनी पवार हिचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करणे, अष्टमी दिवशी अतिषबाजी व  कोजागिरि पोर्णीमैस यात्रेनिमित्त सर्व भाविकभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करणे या विषयी तसेच नवरात्र उत्सवापूर्वी जत नगरपरिषदेला मंडळाकडून लेखी पत्र देऊन श्री.अंबाबाई देवालयाकडे जाणा-या रस्त्याकडेला असलेल्या लोखंडी पोलवर विध्दूत बल्ब व मर्क्युरी ची सोय करणे ,तसेच नवरात्र कालावधीत डोंगर निवासिनी श्री.अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी व आरतीसाठी जाणा-या भाविकभक्तांकरिता जत एस.टी.आगाराकडून जादा बस देण्याबाबत आगार व्यवस्थापक यांची भेट घेणे या विषयीही चर्चा करण्यात आली.
    विशेष म्हणजे श्री.अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्यामार्फत दर तीन वर्षानी नवचंडी होमाचे आयोजन करण्यात येते.यावर्षीही श्री.अंबाबाई मंदिरात नवचंडीहोमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी योग्य ते नियोजन करण्याविषयी या बैठकित चर्चा करण्यात आली.
    यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.शहाजीबापू भोसले , श्री.बाळासाहेब हुंचाळकर, श्री.अजित शिंदे यांना विविध क्षेत्रात सन्मान मिळाल्याने त्यांचा मंडळाच्यावतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे सभासद व सांगली कृषीउत्पन्न बाजार समीतीचे सभापती श्री.सुजय उर्फ नाना शिंदे,श्रीकृष पाटील,पुंडलिक पांढरे,अनिल शिंदे,भारत गायकवाड आदीनी आपले विचार मांडले. स्वागत व प्रास्ताविक श्री.अनिल शिंदे यांनी केले तर आभार श्री.नाना शिंदे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण