राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्याच्या निषेधार्थ दलित महासंघाकडून रास्ता रोको
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शहीद अंकुश सोलनकर चौकात गेल्या आठ महिन्यांपासून पडलेल्या खड्याकडे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित हा खड्डा मुजवावा या मागणीसाठी मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष नवनाथ पवार यांचे मार्गदर्शनाखाली त्या पडलेल्या खड्ड्याचे श्राद्ध घालत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.NH166E विजापूर - गुहाघर हा जत शहरातील शहीद अंकुश सोलनकर या प्रमुख चौकातुन जातो. गेले ८ महिने झाले या चौकतील महामार्गलगत एक मोठा खड्डा पडला असून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जाणीवपुर्वक दुर्लक्षमुळे या रस्ताचे कामास विलंब लागत आहे. या चौकत मोठ्या प्रमाणत वर्दळ असून हाकेच्या अंतरावर शाळा, महाविद्यालय आहेत. शिवाय राष्ट्रीय महामार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच अनेक दिवसंपासूम या मार्गावरील स्ट्रीट लाईट देखील बंद आहेत. या संदर्भात दलित महासंघाकडून काही महिन्यांपूर्वी गाढव मोर्चा काढून निषेध नोंदवला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी हे काम लवकरच पूर्ण करू असे आश्वासन दिले होते परंतु अद्याप त्या ठिकाणी कोणतेही काम झाले नाही.

Comments
Post a Comment