'स्वच्छ जल, स्वच्छ मन’ निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ
पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीच्या छट घाटावर (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला. याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासकीय प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले. बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारीगण, केन्द्रीय एवं राज्य सरकारमधील मंत्री, मान्यवर अतिथि तसेच हजारोंच्या संख्येने निरंकारी स्वयंसेवक आणि सेवादलचे सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मिशनच्या वेबसाईटवरुन करण्यात आले ज्याचा लाभ देशविदेशातील निरंकारी भक्तगणांनी घेतला. या परियोजनेचा शुभारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाण्याचे