Posts

Showing posts from August, 2024

नूतन अध्यक्षाने येळदरी शाळेत 25 हजाराचा डीजे साऊंड व ऍम्प्लिफायर दिला भेट

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क ;     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळदरी येथील शालेय व्यवस्थापन समितीची पदाधिकारी निवड नुकतीच पार पडली या निवडीमध्ये अध्यक्ष म्हणून सिद्धपा भीमाण्णा चौगुले यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांनी आपल्या मनोगतात शाळेसाठी भरभरून मदत करेन व शाळेचा विकास भौतिक सुविधा मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करीन असे अभिवचन दिले व प्रत्यक्ष आपल्या कृतीतून शाळेला आवश्यक असणारे रुपये पंचवीस हजार वस्तू दोन साऊंड बॉक्स व एक मोठा ऍम्प्लिफायर त्यांनी आजच खरेदी करून शाळेत भेट दिला .      या त्यांच्या कामाच्या सिंघम स्टाईलचे गावातून कौतुक होत आहे व त्यांनी दाखवलेली दानशूर वृत्ती शाळेबद्दल प्रेम व सहकार्याची भावना या त्यांच्या कृतीतून दिसून येते.त्यांचा आदर्श घेऊन सर्वांनी काम केले तर शाळेचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही यावेळी मुख्याध्यापक दीपक सुर्वे सर यांनी त्यांचे मनापासून आभार मानले यावेळी पिराजी वाघमारे वीरभद्र कांबळे संभाजी सरगर प्रकाश सरगर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

जत येथे प्रकाश जमदाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच जत तालुक्यातील जनतेचे खंबीर नेतृत्व प्रकाशराव जमदाडे साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण शनिवार दि. ३१ ऑगष्ट रोजी विविध मान्यवरांच्याहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, भाजप संघटक मकरंद देशपांडे, समन्वयक शेखर इनामदार, सिमेंट कॉर्पोरेशन सदस्य डॉ. रवींद्र आरळी, माजी शहर जिल्हाध्य दीपक म्हैशाळकर, राज्य कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.     तालुक्यातील शेतकरी सर्व सामान्य जनता, माता भगिनी यांचे विविध विभागातील सरकारी योजना, शेतकरी बांधव यांचेसाठी विविध योजना तसेंच विविध महामंडळ, शासकीय योजना जिल्हा मध्यवर्ती बँक यांचे माध्यमातून कर्ज पुरवठा महिला अल्पबचत गट यांच्या योजना, लडकी बहीण योजना तसेंच तालुक्यातील तरुण बेरोजगार युवक व युवती यांना आत्मनिर्भर होण्यासाठी तसेंच कामगार नोंदणी करून त्यांना शासकीय विविध योजना यांचा लाभ देण्यासाठी एका छताखाली सर्व सामान्य नागरिक महिला

जत येथे आज होणाऱ्या रिपाईच्या जाहीर सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहा; संजयरावजी कांबळे

Image
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ने जत विधानसभा निवडणुक-२०२४ साठी ठोकला शड्डू. जतवार्ता न्यूज नेटवर्क;      रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे माजी सांगली जिल्हा अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव व आदर्श पुरस्कार विजेते माजी सरपंच माननीय संजयजी कांबळे यांनी जत विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव माननीय संजयजी कांबळे यांनी जत विधानसभा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साठी सोडण्यात यावा अशी जाहीर मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवलेसो व रि.पा.ई.चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदेसो यांच्याकडे केली आहे.     जत विधानसभा क्षेत्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद असून सर्व जाती-धर्माचे लोक रिपब्लिकन पक्षांमध्ये कार्यरत आहेत. रिपब्लिकन पक्षाने जत तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी आंदोलने निदर्शने निवेदने करून सरकारला व प्रशासनास जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.

लोकनेते स्वर्गीय बी.आर. काका शिंदे यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     लोकनेते स्वर्गीय बी.आर. काका शिंदे यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी ८ ऑगष्ट रोजी सकाळी १० वा. रक्तदान शिबिर व सायंकाळी ६ वा. सुरेल भक्ती-भाव गीतांचा, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विक्रमसिंह सावंत हे उपस्थित राहणार असून प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे हे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.     यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरज बिजली, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जत मार्केट यार्ड येथील बी.आर. काका यांच्या पुतळ्याचे सकाळी साडेनऊ वाजता पूजन व त्यानंतर वरील कार्यक्रमास सुरुवात होईल. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुजय शिंदे यांनी केले आहे.

विस्तार अधिकारी श्रीशैल बिराजदार यांचा कोळगिरी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिराजदार यांची पंचायत समिती जत येथे पदोन्नतीने विस्तार अधिकारी पदी निवड झालेबद्दल ग्रामपंचायत कोळगिरी च्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.      निवडीनंतर त्यांनी ग्रामपंचायत कोळगिरी येथे सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना ते म्हणाले की गाव गाड्यांचा विकास होऊन सुधारणा होणेसाठी मी सर्वोपरी सहकार्य करेन नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणेचे सांगितले.      यावेळी कोळगिरी गावच्या सरपंच श्रीमती मल्लव्वा हेळवी, उपसरपंच सुरेश निळे, ग्रामपंचायत सदस्या सौ करुणा बाबर, ग्रामसेवक दत्ता साळेमार्केट कमीटीचे माजी संचालक जगदेव माळकोटगी, माझी सरपंच चंद्रशेखर पाटील, सोसायटी संचालक रेवाप्पा मुधोळ, रमेश बाबर,अन्वेष हेळवी, बाळासाहेब खिलारे, शिवाजी काटे,राजु चव्हाण, आदी उपस्थित होते.

राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची महत्त्वाची भूमिका: डॉ. तानाजी चौगले

Image
राजे रामराव महाविद्यालयात सातदिवसीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेला प्रारंभ विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळा व राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगले सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील व विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. भीमाशंकर डहाळके जतवार्ता न्यूज नेटवर्क;     राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयामार्फत चालवली जाणारी भारतातील सर्वांत मोठी युवकांची संघटना असून याअंतर्गत देशभरातील ४५ लाखापेक्षा जास्त स्वयंसेवकांचे संघटन झाले आहे. सामुदायिक सेवेद्वारे व्यक्तिमत्त्व विकास, वृक्षारोपण, जलसंधारण, श्रमसंस्कार शिबिर, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, संभाषण कौशल्य, ग्रामीण जन जीवनाचा अनुभव अशा कामांमुळे राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.तानाजी चौगले यांनी केले.       ते राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापूर्वी जातीचे दाखले न मिळाल्यास प्रांत कार्यालयावर आदिवासी समाजाचा अर्ध नग्न मोर्चा काढण्याचा इशारा; बसवराज चव्हाण

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;      आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी कार्यालय जत येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये तालुक्यातील दुष्काळी भागातील व इतर बहुजन समाजातील अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण यांनी जत मधील आदिवासी पारधी समाजाच्या अडचणी आमदार पडळकर यांच्यासमोर मांडल्या. यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सुरज बिजली, संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर माघाडे, मुख्याधिकारी कुंभार तसेच इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.      यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलताना बसवराज चव्हाण म्हणाले की, आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले देण्यासंदर्भात प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडून आदिवासी पारधी समाजाला जातीचे दाखले तातडीने द्यावे असा आदेश असताना गेले दीड ते दोन वर्ष या समाजाला दाखले दिले जात नाहीत. त्यामुळे शासनाच्या ज्या काही योजना असतील, घरकुल मुलांच्या शिक्षणासाठी व नोकरी संदर्भात जातीचे दाखले असणे गरजेचे आहे. वारंवार प्रांत ऑफि

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे विचार समाज परिवर्तन घडविणारे; डॉ.रामदास बनसोडे

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;      लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे विचार समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणारे आहेत. समाज व राष्ट्र विकसित झाले पाहिजे म्हणून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या साहित्याचा अभ्यास आजच्या तरुण पिढीने केला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.रामदास बनसोडे यांनी केले.      ते राजे रामराव महाविदयालय, जत येथे मराठी विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा.कुमार इंगळे हे होते. यावेळी प्रा.सागर सन्नके, डॉ.ज्ञानेश्वर कांबळे व प्राध्यापिका रेश्मा लवटे उपस्थित होते.      यावेळी पुढे बोलताना डॉ.रामदास बनसोडे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांचे योगदान महत्वाचे आहे तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याचे योगदान महत्त्वाचे आहे असे सांगून डॉ.रामदास बनसोडे यांनी आपल्या भाषणातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रवासाचा आणि लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्य चळवळीतील  योगदानाच