Posts

Showing posts from September, 2024

जत भाजपा करणार तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा सत्कार; बसवराज पाटील यांची माहिती

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क;      महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारमधील राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यातील सर्व पोलीस पाटलांचे मानधन ६५०० वरून वाढवून १५००० रुपये केले केले आहे. जत तालुक्यात असलेले १२३ गावातील सर्व पोलीस पाटलांचे भारतीय जनता पार्टी व तम्मनगौडा रवीपाटील युथ फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती सरपंच परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली आहे.     जत तालुका हा भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा तालुका असून कायम दुष्काळी तालुका आहे. जत तालुक्यातील गावोगावचे पोलीस पाटील गाव संरक्षण करत असतात त्यामुळे त्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागतो. ६५०० चे मानधन त्यांना पुरेसे नाही हे लक्षात घेऊन गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना १५००० रुपयांचे मानधन जाहीर केले आहे. जत तालुक्यातील पोलीस पाटील जत शहरात दर महिन्याला मीटिंगसाठी येतात याठिकाणी बैठक घेण्यासाठी कोठेही सभागृहाची उपलब्धता नाही म्हणून त्यांना बैठक घेण्यासाठी सुसज्ज असा पोलीस पाटील भवन लवकरच मंजूर करून देण्यासाठी भाजपाचे जत विधानस

जत तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करणार : मन्सूर खतीब

Image
उबाठाच्या दिनकर पतंगेंसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश जतवार्ता न्यूज नेटवर्क ;     आगामी जत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकत सर्वांना दाखवून देऊ, पक्षाने संधी दिल्यास ही जागा आम्ही निश्चित लढाऊ. पक्षाला मानणारा जत तालुक्यात मोठा वर्ग आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तालुक्यात राष्ट्रवादीचे जाळे भक्कम केले जात आहे. तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करणार असल्याचे मत सांगली जिल्हा बँकेचे संचालक तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब यांनी केले.     जत येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिनकर पतंगे यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर विठ्ठल कोळी, शिवानंद तिकुंडी, महावीर मडीमनी, अब्बास मुजावर यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. सांगली कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, सांगली जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, मच्छिद्र वाघमोडे, पापा हुजरे यांच्या उपस्थितीत जतच्या राष्ट्रवादी कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला. सुरेश शिं

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत येथील सामाजिक उन्नती व अपंग निराधार पुनर्वसन विकास संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टेंबर रोजी जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिर आयोजित केल्याची माहिती रिपाइं आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे यांनी दिली.     प्रमुख पाहुणे म्हणून जतचे प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी कुंदन शिनगारे, जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, संखच्या अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास, जतचे नायब तहसीलदार पंडित कोळी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, पोलिस निरीक्षक सूरज बिजली, एल. ए. क्षीरसागर, एन. एस. सावंत, सुनील मंडले, योगेश सूर्यवंशी, शंकर कुऱ्हाडे उपस्थित राहणार आहेत.

धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा जिल्हाधिकारी, तहसिल कार्यालयात मेंढरे घुसवू; तुकाराम बाबा महाराज

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-     राज्यातील महायुतीचे सरकार आरक्षणावरून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. ज्या स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगरांनी इंग्रजाला सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून वाट दाखवली त्याच धनगर समाजाला आज आरक्षणासाठी लढावे लागत आहे, ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांज राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी, तहसिल कार्यालयात मेंढरे घुसवू असा इशारा दिला.     जत तालुक्यातील सोन्याळ फाटा येथे हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजता सोन्याळ फाट्यावर रस्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली. रस्ता रोको आंदोलनाने जत-उमदी मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली. रस्ता रोकोमध्ये मेंढपाळ तानाजी कुलाळ यांनी आपली मेंढरे रस्त्यावर उभी करत वेगळ्या पद्धतीने रस्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदविला.      यावेळी सोमण्णा हाक्के, भाऊसाहेब कटरे, एकनाथ बंडगर, शिवानंद पुजारी, व

जत तालुक्यातील ५१ हुन अधिक गणेश मंडळाना श्री ची मूर्ती भेट; एक गाव एक गणपती गावाला प्राधान्य; तुकाराम बाबा महाराज

Image
५१ हजार टी शर्ट चे वाटप सुरू; बागडेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्य उद्या काल्याचे कीर्तन जतवार्ता न्यूज नेटवर्क;     श्री संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गावांना श्री च्या मुर्त्या मोफत भेट देण्यात आल्या. बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य चिक्कलगी भुयार येथे संगीतमय भागवत कथा व गोंधळेवाडी येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सोमवारी काल्याच्या किर्तनाने पुण्यतिथी सोहळयाची सांगता होणार आहे.     श्री संत बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य मागील १४ वर्षांपासून एक गाव एक गणपती राबविणाऱ्या गणेश मंडळाला श्री ची मूर्ती भेट देणारे हभप तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने याहीवर्षी जत तालुक्यातील ५१ हुन अधिक गणेश मंडळाना श्री ची मूर्ती भेट दिली आहे. यात प्रामुख्याने तालुक्यात एक गाव एक

इशारा... अन् अखेर जाडरबोबलाद- मारोळी रस्त्याचे काम सुरू; तुकाराम बाबांच्या आव्हानानंतर अखेर प्रशासनास आली जाग; अनेक दिवसांपासून बंद असलेल्या कामास अखेर सुरुवात

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत तालुक्यातील जाडरबोबलाद ते मारोळी रस्त्याचे काम  रखडले होते. आंदोलन केल्यानंतर आश्वासन देवून वर्ष उलटून गेले तरी काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ त्या मार्गावरील रस्त्यावरच चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी गुरुवारी वास्तुशांती सोहळा करून सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले होते. या अनोख्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने काम सुरू केले. आंदोलनस्थळी काम सुरू करण्यासाठी ज्या मशिनरी आल्या होत्या त्याचे पूजन करून तुकाराम बाबा यांनी आंदोलन मागे घेतले.     यावेळी मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ, उमेश मुल्ला, रामलिंग मेडेदार,अमृत पाटील महाराज.काटे महाराज जवळा, तुकाराम जोंधळे, नारायण नरळे, भारत खांडेकर, संतोष चेळेकर, महेश भोसले, सुनील कांबळे,आबा खांडेकर ,मल्लेश हाताळी, आबा खांडेकर, मल्लेशातळे, बसू बिराजदार, गंगास्वामी, सलीम अपराध आदी उपस्थित होते.     जाडरबोबलाद ते मारोळी रस्त्याची दुरावस्था झाल्याने सोन्याळ येथे मागील व

राजे रामराव महाविद्यालय, जत येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;      राजे रामराव महाविदयालय, जत येथे महाविद्यालयातील आर्टस्, कॉमर्स, सायन्स व ज्युनियर विभागामध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने  'शिक्षक दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज महा‌विद्यालयातील अध्यापनाचे कामकाज विद्यार्थी शिक्षकांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावून अध्यापन कार्याचा आनंद अनुभवला. यावेळी सकाळ सत्रामध्ये प्राचार्य म्हणून कु.अक्षता व्हनखंडे तर दुपार सत्रामध्ये कु.वैष्णवी भोसले हिने कामकाज पाहिले. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी विद्यार्थीनी सर्व प्राध्यापकांचा सत्कार केला.       याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, भारतामध्ये गुरु-शिष्य हि परंपरा फार प्राचीन आहे. जीवनामध्ये जे जे आपल्याला मार्ग दाखवितात, मार्गदर्शन करतात ते ते सर्व आपले गुरु आहेत. म्हणून आजचा दिवस हा आपल्या शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस आहे. आई-वडील व शिक्षक हेच माणसाच्

श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे हे आधुनिक जत संस्थानचे शिल्पकार; आमदार विक्रमदादा सावंत

Image
"रामराव डे" निमित्त महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन जतवार्ता न्यूज नेटवर्क;     श्रीमंत राजे रामराव  महाराज डफळे यांनी जत संस्थानाचा राजकारभार करताना राजेशाहीच्या जोडीला लोकशाही रुजविण्याचा प्रयत्न केला. प्रजेच्या कल्याणासाठी इ.स.1924 मध्येच शैक्षणिक संस्था, सार्वजनिक दवाखाना, नगरपरिषद, स्पोर्ट्स क्लब यासारख्या संस्था स्थापन करुन नव्या क्रांतीला सुरुवात केली, म्हणून श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांना आधुनिक जतचे शिल्पकार म्हणून गौरविले जाते, असे प्रतिपादन आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले.      ते राजे रामराव महाविद्यालय,जत येथे सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने जत संस्थानचे भुतपूर्व नरेश श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाविद्यालयात श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांची पुण्यतिथी "रामराव डे" म्हणून साजरी करण्यात येते. प्रारंभी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती