Posts

Showing posts from July, 2024

आमदार पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;    आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील समस्या जाणून घेण्याकरिता सर्व प्रशासकीय यंत्रणांची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.      यावेळी महसूल विभागाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जत तालुक्यातील विविध समस्या जाणून घेण्याकरिता आढावा बैठकीचे आयोजन दि. १ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय आवारातील "तलाठी हॉल" येथे  केले आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, भूमी अभिलेख, महावितरण इत्यादी कार्यालयांच्या विरुद्ध ज्या काही समस्या असतील, तक्रारी असतील त्यांनी स्वतः उपस्थित राहून लेखी स्वरूपात अथवा तोंडी स्वरूपात प्रश्न मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर बैठकीस येत असताना नागरिकांनी आपले कार्यालयाशी निगडित नोटीस दोन प्रतीत आणाव्यात असेही आवाहन करण्यात आले आहे.

सिद्धनाथ हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक पदाची नेमणूक करा; आशिष शिंदे सरकार

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील श्री सिद्धनाथ हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक पदाची नेमणूक करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे युवा नेते आशिष शिंदे सरकार यांनी केली आहे. लेखी निवेदन गट शिक्षण अधिकारी यांना जत पंचायत समिती येथे देण्यात आले आहे. यावेळी युवक नेते विक्रम ढोणे, सागर कांबळे उपस्थित होते. निवेदन गटशिक्षण अधिकारी राम फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सर शेख यांनी स्वीकारले.     निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील श्री सिद्धनाथ हायस्कुलमध्ये इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. सध्या विद्यार्थ्यांना विविध दाखल्यासाठी मुख्याध्यापक यांची आवश्यकता आहे. मात्र या पदाचा कार्यभार सध्या कोणाकडेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढत आहेत. पुढील शिक्षणासाठी बोनाफाईड, दाखले यासाठी मुख्याध्यापक यांचे सह्याचे अधिकार कोणाकडेच नसल्याने अडचणी येत आहेत. तरी तातडीने मुख्याध्यापक पदाची नेमणूक करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी लेखी निवेदन सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे तात्काळ पाठवून देण्याची माहिती उपस्थित अ

तुकाराम महाराजांच्या सततच्या प्रयत्नामुळे म्हैशाळ विस्तारित योजनेचे काम सुरू झाल्याबद्दल व्हसपेठ ग्रामस्थांकडून तुकाराम बाबांचा सत्कार

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-       जत तालुक्यातील माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी व्हसपेठ, गुडडापूर, अंकलगी या भागात बंदिस्त पाईपलाईनद्वारे सोडावे या मागणीसाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांनी लढा उभारला. शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. बाबांच्या या लढ्याला, पाठपुराव्याला यश आले असून माडग्याळ ते अंकलगी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. व्हसपेठ भागात प्रथमच बाबांच्या प्रयत्नामुळे पाणी येणार असल्याने व्हसपेठ ग्रामस्थांच्या वतीने तुकाराम बाबांचा सत्कार करण्यात आला.     व्हसपेठ ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी रामण्णा सुतार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्हसपेठच्या सरपंच पूनम तुराई, उपसरपंच अर्चना घोदे , ग्रामपंचायत सदस्य शानूर नदाफ, संगीता हुवाळे , सुमन जाधव, भगवान तुराई,  माजी सरपंच राम साळूंखे, सुखदेव साळूंखे, बिराप्पा शिवाजी निळे, संभाजी लेंगरे, अबाजी वगरे, वसंत निळे, अमन शेख, अशोक निळे, राजू धोंडमनी, बिराप्पा निळे, बटू सनदी,आदी उपस्थित होते. यावेळी बोलता

भित्तिपत्रिकेतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते; कॅप्टन प्रा.पी.ए.सावंत

Image
मराठी विभागाच्या वतीने प्राचीन व आधुनिक साहित्यिकांवर भित्तिपत्रिकेचे उद् घाटन जतवार्ता न्यूज नेटवर्क;     महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कला कौशल्यांना संधी मिळावी, तसेच लेखन कौशल्य क्षमता विकसित होण्यासाठी व विचारांना चालना देण्यासाठी भित्तिपत्रिका हे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन कॅप्टन प्रा.पी.ए.सावंत यांनी केले.     ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे मराठी विभागाने आयोजित केलेल्या भित्तिपत्रिकेच्या उद् घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र एन.सी.सी 16 बटालियन हवालदार दिपक खामकर प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी मराठी विभाग प्रमुख प्रा.कुमार इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून भित्तिपत्रिका घेण्यामागील उद्देश स्पष्ट करून सांगितला.     यावेळी पुढे बोलताना कॅप्टन प्रा.पी.ए.सावंत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनातील भावनेला शब्दांच्या रूपाने वाट मोकळी करून देण्यासाठी भित्तिपत्रिका हे प्रभावी माध्यम आहे. मराठी विभागाने भित्तिपत्रिकेच्या माध्यमातून प्राचीन व आधुनिक लेखक व कवयत्रिंची माहिती करुन दिली. प्रारंभीच्या कालखंडात ज्या ज्या लेखक कविंनी मराठी भाषेची सेवा केली

२९ जुलै धनगर समाजाचा "विश्वासघात दिवस"; दहा वर्षाचा धनगर आरक्षणाचा प्रवास वेदनादायी; विक्रम ढोणे

Image
शिंदे फडणवीस सरकारने दिलेला शब्द पाळाला नाही. सरकारने धनगर एसटी आरक्षणाकडे गांभीर्याने न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा; संयोजक धनगर विवेक जागृती अभियान महाराष्ट्र राज्य विक्रम ढोणे यांनी दिला. जतवार्ता न्यूज नेटवर्क;     भाजप शिवसेनेने २०१४ साली धनगर समज्याला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन धनगर समाजाचा विश्वासघात केला या घटनेला १० पूर्ण झाले असल्याने निषेध व्यक्त करीत धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून जत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.     २९ जुलै २०१४ साली बारामती येथे धनगर समाज्याचे आंदोलन चालू होते त्या आंदोलनाला पाठींबा देत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समज्याला विश्वास दिला आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढतो राज्यातील धनगर समाज्याने भाजप शिवसेनेला एकहाती सत्ता दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राज्यातील धनगर समाजाला आनंद झाला आणि धनगर आरक्षण प्रश्न सुटणार असा विश्वास निर्माण झाला पण तिथेच धनगर सामज्याचा विश्वासघात झाला आहे. दहा वर्षे दिशाभूल करून वेळकाढूपणा करण्यात राज्य

म्हैसाळच्या पाण्यासाठी संख येथे २२ जुलै रोजी रस्ता रोको व आमरण उपोषण..हभप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:     जत तालुक्यातील माडग्याळ येथे म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. ते पाणी व्हसपेठ, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात सोडावे या मागणीसाठी संख (ता.जत) येथे २२ जुलैपासून रक्त घ्या, पण पाणी द्या आंदोलन, आमरण उपोषण व रास्ता रोको करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिली आहे.    माडग्याळ येथे दाखल झालेले पाणी व्हसपेठ, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात सोडावे या मागणीसाठी अंकलगी येथे ७५हून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले. तीन दिवस उपोषण केले. त्यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले. येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही.     सहा महिने झाल्यानंतर जून महिन्यात तुकाराम महाराज यांनी २२ जुलैपर्यत म्हैसाळचे पाणी न आ