Posts

Showing posts from August, 2023

माजी सैनिकांसाठी आता संस्था काम करणार

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क :        जत तालुक्यातील आवंढी येथे माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. माजी सैनिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली असून तालुकाभर या संस्थेचा विस्तार केला जाणार असल्याचे संस्थापक/अध्यक्ष ऑन कॅप्टन बबन कोळी, उपाध्यक्ष ऑन सुभेदार मेजर विश्वंभर कोडग यांनी सांगितले.      यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, माजी सैनिकांनी सेवेत असताना देशसेवा तर केलीच आहे, आता सेवानिवृत्तीनंतर सामाजिक बांधिलकी जपत राजकीयदृष्ट्या देखील काम केले पाहिजे, त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मदतच होईल.       आमदार सावंत पुढे म्हणाले कि, तालुक्यातील प्रत्येक गावात माजी सैनिकांची संघटना स्थापन करुन संघटनेच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आ. सावंत म्हणाले. माजी सैनिक संस्थेच्या आवंढी शाखेच्या नुतन कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर स्वतःच्या फंडातून देण्याचे यावेळी आ.सावंत यांनी जाहिर केले.     प्रारंभी आ. सावंत व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महारांजांच्या प्र

उमदी येथे अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Image
  जत,सांगली:        समता अनुदानित आश्रमशाळा, उमदी (ता. जत) येथील अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत व सर्वोत्तम उपचाराबाबत जिल्हा व आरोग्य प्रशासन सतर्क आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली व धोक्याबाहेर असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांची मिरज वैद्यकीय महाविद्यालयास भेट       जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भेट देऊन, तेथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच, जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ येथील रूग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर आदि उपस्थित होते.             यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या विद्यार्थ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कसूर ठेवू नये, अशा सूचना आरोग्य प्रशासनास दिल्या.  विद्यार्थ्यांवर चार ठिकाणी उपचार      

कवठेमहांकाळ येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क:       सह्याद्री आदिवासी कर्मचारी असोसिएशन सांगली जिल्हा आयोजित जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात कवठेमहांकाळ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे,सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी बांधव भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात  उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.       कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनवणे यांनी सर्व आदिवासी बांधवाना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पुणे विभागीय अध्यक्ष सिताराम भौरले यांनी आपल्या मनोगतात संघटनेने केलेले कामे सांगितले, संघटना ही एकट्याची नसून सर्व आदिवासी बांधवांची आहे. संघटने बऱ्याच बांधवांना न्याय मिळवून दिला हे सांगितले. प्रमुख अतिथी ठाकरे यांनी आपल्या परखड मनोगतातून व आपल्या समाजाने एकी दाखवली पाहिजे अन्याय सहन न करता आपण प्रतिकार केला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजना तसेच आदिवासी बांधवांसाठी असलेल्या सर्व योजना सरकार बंद पाडत आहे. याकड

कवठेमहांकाळ येथे जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन

Image
  जत,प्रतिनिधी:      ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातही सह्याद्री आदिवासी कर्मचारी असोसिएशन च्या अंतर्गत ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा रविवार दि.१३ ऑगस्ट रोजी शाहीदरबार हॉल, कवठेमहांकाळ येथे आयोजित करण्यात आला असून या जागतिक आदिवासी दिनाकरिता सांगली ,सोलापूर ,कोल्हापूर ,पुणे, सातारा या जिल्ह्यातून आदिवास कर्मचारी आपल्या सहकुटुंब येणार असून सांगली जिल्ह्यातील सर्व आदिवासी कर्मचारी बांधवानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ,असे आवाहन सह्यादी आदिवासी कर्मचारी असोसिएशन सांगली चे अध्यक्ष गंगाराम सलामे, उपाध्यक्ष साळुंखे, सचिव प्रमोद सलामे, कवठेमहांकाळ अध्यक्ष सोनवणे सर, दगडू जोशी, पालवी सर तसेच पुणे विभागीय अध्यक्ष सिताराम भौरले यांनी केले आहे.

ठोस आश्वासनानंतर रस्ता रोको आंदोलन मागे

Image
रस्ते , पाणी व अन्य मागण्यांसाठी तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली सोन्याळ फाटयावर एक तास रस्ता रोको जतवार्ता न्यूज नेटवर्क:-        जत तालुक्यातील विविध मागण्यांसाठी क्रांती दिनी नऊ ऑगस्ट रोजी जत-उमदी रोडवरील सोन्याळ फाटा येथे सकाळी अकरा वाजता चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली एक तासाहून अधिक वेळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.      आंदोलनात सोन्याळचे सरपंच बसवराज तेली, माजी उपसरपंच चिदानंद तेली, अंकलगीचे सरपंच परमेश्वर बिरादार, गडदु मुल्ला, विजयकुमार बगली, तंटामुक्तीचे अध्यक्ष विठल बिरादार,  विठ्ठल शिदे, शंकर शिंदे, संगापा पुजारी, कल्लापा शिगे, मुदका नाटीकार, नितिन शिंदे, विश्वनाथ आरळी, अमिन कांबळे, मुकेश बनसोडे, मानव मित्र संघटनेचे सदस्य, कवठेमहांकाळ माजी सभापती अजितराव, सुनिल वाले, अशोक भडक, राजु सरगर, अनिल सरगर, पांडुरंग शिंदे, व्यंकू तेली, सिध्दाणा पुजारी, सोमनिंग पुजारी, चिदानंद काराजनगी,सिद्राम मुंचडी यांच्यासह सोन्याळ,अंकलगी, गारळेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.        लकडेवाडी

काँग्रेस पक्षाचे वतीने जत येथे आगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क:       जत येथे काँग्रेस पक्षाचे वतीने महात्मा गांधी आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून आगस्ट क्रांतीदिन आणि जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.        यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की, ब्रिटिशांनी देशावर १७५ वर्षे राज्य केले आणि ब्रिटिशांना देशातून हाकलून लावण्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी २८ डिसेंबर १८८५ रोजी आजचा काँग्रेस पक्ष म्हणजे राष्ट्रीय महासभा याची स्थापना झाली. स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर १९२० सालापासून स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी यांचेकडे गेल्याने ७ आगस्ट १९४२ रोजी मुंबई येथील गवालिया टँक मैदानात काँग्रेस पक्षाचे अधिवेशनात ८ आगस्ट १९४२ "छोढो भारत" आंदोलनाची घोषणा होऊन 'करेंगे यामरेंगा' हा नारा देण्यात आला आणि ८ आगस्ट रोजी रात्री महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू सह सर्वांना अटक करण्यात आली. त्यामुळे ९ आगस्ट १९४२ जनतेने

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;      काँग्रेस पक्षामध्ये गेली अनेक दिवस प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडणारे व आमदार सावंत यांचे विश्वासू जत येथील शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेस पक्ष्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार सावंत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचे काम मी प्रामाणिकपणे पार पाडेण असे मत तंगडी यांनी यावेळी व्यक्त केले.       यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबासाहेब तात्या कोडग, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, येळदरीचे सरपंच राम सरगर, दानम्मा देवी दूध सेवा संघाचे संचालक रावसाहेब मंगसुळी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, भूपेंद्र कांबळे, जत शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश जाधव, प्रताप कोडग आदीजण उपस्थित होते.

कॉग्रेस पक्षाच्या वतीने जतमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने आनंद उत्सव साजरा करण्यात आला

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:       १३ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीत कर्नाटक राज्यातील कोलार येथे प्रचार सभेत राहुल गांधी यांनी निरव मोदी, ललित मोदी यांनी देशाचे कोट्यावधी रुपये बुडवून परदेशात पळून गेले या सर्व चोर लोकांची नावे मोदी कशी आहेत असा प्रचार केल्याने गुजरात सुरत येथील भाजपाचे पूर्णेस मोदी यांनी देशातील सर्व मोदी समाजाची मानहानी झाली म्हणून १६ एप्रिल २०१९ रोजी सुरत कोर्टात याचिका दाखल केल्याने २ मे २०१९ रोजी एफआयआर दाखल झला. १६ जुलै २०१९ रोजी राहुलजी सुरत कोर्टात हजर झाले. पुढे २९ आक्टोंबर २०२१ रोजी सुनवनी झाली. ७ मार्च २०२२ रोजी यांनी उच्च न्यायालयात आपल्याच केसवर स्थगिती आणली. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राहुलजी यांनी गौतम आडनी यांच्या हिंडेन बर्ग रिपोर्ट चौकशी करण्याची मागणी केली. १० फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्णेश मोदी यांनी स्थगिती मागे घेतली. न्यायधीश म्हणून हरिश हसमुख वर्मा यांची बदली कोर्टात झाली. त्वरित सुनावणी होऊन २३ मार्च २०२३ रोजी राहुलजी यांनी दोन वर्षाची शिक्षा दिली म्हणून त्यांचे लोकसभा सदस्यता रद्द केली. २ एप्रिल २०२३ रोजी राहुलजी यांनी महानगर न्यायालयात सुरत येथे अर्ज

जत तालुक्यात आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन

Image
तहसीलदार जिवन बनसोडे यांची माहिती : विविध कार्यक्रमांचे आयोजन जतवार्ता न्यूज नेटवर्क:        जत तालुक्यात आजपासून पुढील ७ दिवस महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार जिवन बनसोडे यांनी दिली. या ७ दिवसांत तालुक्यातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.        या सप्ताहामध्ये १ ऑगष्ट रोजी महसूल दिन  साजरा करणे महसूल सप्ताह शुभारंभ करण्यात येणार आहे. २ ऑगष्ट रोजी जत येथील तलाठी हॉल येथे युवा संवाद, विविध प्रश्नांवर युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. ३ ऑगष्ट रोजी एक हात मदतीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ऑगष्ट रोजी जनसंवाद, विविध प्रश्नांवर जनतेशी संवाद साधण्यात येणार आहे. ५ ऑगष्ट रोजी जत येथे सैनिकहो तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांत माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. ६ ऑगष्ट रोजी तहसील कार्यालयात कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद व विविध प्रश्नांबाबत चर्चा होणार आहे. तसेच ७ ऑगष्ट रोजी महसूल सप्ताहाची सांगता होणार असून ७ दिवसांमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. नागरि