Posts

Showing posts from October, 2024

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. विक्रमसिंह सावंत यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क;    काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जत विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. विक्रमसिंह सावंत यांनी जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी मार्केट कमेटी जत येथे आ. सावंत यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी सभेला संबोधित केले. सभा झाल्यानंतर जत शहरातून भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.     सभेला संबोधित करत असताना माजी मंत्री विश्वजीत कदम म्हणाले की, आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत जत तालुका हा विकासात अग्रेसर ठरला आहे. त्यांनी जत मतदारसंघातील पाणी व इतर प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडून मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. त्यांनी म्हैसाळ, तुबची बबलेश्वरच्या पाण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला आणि जत तालुक्याला पाणी मिळवून दिले. कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारा, जत मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत पुढे नेणार

अल्पवयीन मुलीचे अपहरण; पोलिसात तक्रार देऊनही कारवाई करत नसलेने नातेवाईकांचा उपोषणास बसण्याचा इशारा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क ;     जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद येथे एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी उमदी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, या घटनेला दीड महिना उलटूनही पोलिसांनी अद्याप संशयितांना अटक केलेली नाही. याबाबत लक्ष्मण खांडेकर यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली आणि आठ दिवसांच्या आत संशयितांना अटक न केल्यास जत येथील पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.     तक्रारीनुसार, ३० ऑगस्ट रोजी संशयित बेळयानसिद्ध शेंडगे व पवन सुभाष शेंडगे या दोघांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. यापूर्वी त्यांनी मुलीची छेड काढल्याची तक्रार देखील नोंदवली होती, त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.     खांडेकर यांनी सांगितले की, अपहरण करणारे युवक आणि त्यांचे कुटुंबीय राजकीय आणि गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे मुलीच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. मुलीला ताब्यात देण्याची विनंती केली आहे. तसेच आठ दिवसांत कारवाई न केल्यास पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर

वृत्तपत्र विक्रेता व वाचन प्रेरणादिनानिमित्त जत येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम याना अभिवादन

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क ;     वृत्तपत्र विक्रेता व वाचन प्रेरणादिनानिमित्त भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना वृत्तपत्र विक्रेते, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.     देशभर सर्वत्र भारताचे दिवंगत माजी  राष्ट्रपती व मिसाईल मॅन डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणादिनाचे आयोजन करण्यात आले होते.     जत येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात असलेल्या वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांच्या सदगुरू शाॅपी व पेपर स्टाॅल या ठिकाणी भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस जेष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.      यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, दै.तरूण भारतचे जत तालुका प्रतिनिधी किरण जाधव, केसरीचे जत तालुका प्रतिनिधी प्रदीप कुलकर्णी, सामाजीक कार्यकर्ते विक्रम ढोणे, महांतेश डोणूर, अशपाक हुजरे, अप्पय्या स्वामी, विलास बामणे, अब्दुल मसरगुप्पी सुनिल कोळी, गोरख पवार आदी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Image
          जत,सांगली, दि. 15 : मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिले.                विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणुकीच्या विविध कामांसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.                जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, विधानसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक

जतयेथे सालाबादप्रमाणे विजयादशमी,दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जतयेथे सालाबादप्रमाणे विजयादशमी,दसरा सण मोठ्या उत्साहात पार पडला. येथील श्रीराम मंदिरापासून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीसोबत जतचे संस्थानीक व श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे ,युवराज श्रीमंत अनिरुद्ध राजे व शिवांश राजे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.     ही पालखी जत येथील वेशीतून प्रवेश करून ती शिमोल्लंघनाचे ठिकाणी आल्यानंतर पालखी प्रदक्षीणा झाल्या. यानंतर संस्थानचे पुरोहीत रमेश पुरोहीत यांनी विधिवत शमीच्या ढीगाची पूजा केली. त्यानंतर श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी आरती केल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सोने लुटण्यासाठी नागरीक एकमेकांच्यावर तूटून पडले होते.    यानंतर श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी सोने वाटप करीत सर्व उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उध्दव ठाकरे गटाचे नेते श्री.दिनकर पतंगे ,मोहन चव्हाण, कैलास आदाटे ,पापा सनदी,गुरू बिज्जरगी,चंद्रसेन माने-पाटील, संग्राम राजेशिर्के,प्रा.कुमार इंगळे,मोहन माने-पाटील, पोलीस पाटील मदन माने-पाटील, अमर जाधव, डाॅ.देवानंद वाघ आदींसह हजा

जत येथे माळरान कृषी प्रदर्शनास सुरवात; खा.विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क ;    माळरान कृषी २०२४ या भव्य कृषी व पशु प्रदर्शनाचे उदघाटन खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. जत तालुक्यातील जनतेसाठी हा महोत्सव सलग चार दिवस चालणार आहे. या प्रदर्शनामध्ये ३०० हून अधिक स्टॉल्सची सोय करण्यात आली आहे, ज्यात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक कृषी साधने, नवतंत्रज्ञानावर आधारित कृषी यंत्रे व उत्पादनांच्या प्रदर्शनाचा समावेश आहे.    आमदार विक्रमसिंह सावंत यांनी या माळरान कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नव्या संधीबरोबरच महिलांसाठी बचत गट व लघू उद्योगांना प्रोत्साहन देणारे कर्ज प्रकरणांचे मार्गदर्शनदेखील होणार आहे. याशिवाय, मेंढी व शेळी प्रदर्शन, कृषी नवकल्पना, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचादेखील आनंद सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे सर्व जतकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावावी. असे आवाहन आमदार सावंत यांनी केले आहे.     यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, सभापती सुजय शिंदे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडक, आप्पाराय बिराजदार आदीज

जत नगरिची ग्रामदेवता, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.यल्लमादेवी व डोंगरनिवासिनी श्री.अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती, भजन,आरती,जोगव्याने भाविक मंत्रमुग्ध

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क ;     जत नगरिची ग्रामदेवता श्री.यल्लमादेवीचे मंदिरावर नवरात्रीनिमित्त अकर्षक अशी विध्दूत रोषणाई केल्याने हे मंदीर रोषणाईने फुलून गेले आहे. नवरात्रीत दररोज पहाटे साडेपाच वाजता आरती करण्यात येते तत्पूर्वी देवीचे पूजारी सुभाष कोळी व स्वप्नील कोळी हे देवीची विधिवत पूजा करतात. त्यानंतर देवीच्या जोगतीनी रंजना पवार व सहकारी हे देवीचा जागर करतात. यावेळी मोठ्यासंख्येने भक्तगण उपस्थित राहून रांगेणे देवीचे दर्शन घेतात.    श्री.यल्लमादेवीची आरती झाल्यानंतर भक्तगण हे डोंगरनिवासिनी श्री.अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जातात. दररोज पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी जाणा-या व दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविक भक्तांची मोठी गर्दी रस्त्यावर दिसते.    श्री. अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्यावतीने श्री.अंबाबाई डोंगरावरील देवीच्या मंदिरात दररोज देविची विधिवत पूजा करण्यात येते देवीचे पौरोहीत करणारे अनिल देशपांडे व भूषण साळे व अथर्व देशपांडे हे दररोज श्री.नवदुर्गाचे दर्शन घडवितात. देवीची आरती ही नवरात्रीत दररोज सकाळी साडेसात वाजता करण्यात येते. तत्पूर्वी  देवीची विधिवत पूजा करण्यात येते. त्यान

जत येथे विक्रम फाऊंडेशन आयोजित महिलांसाठी रास दांडिया स्पर्धांचे आयोजन

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क :     जत येथे विक्रम फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी रास-दांडिया स्पर्धांचे आयोजन केले आहे. आज बुधवार आणि गुरुवारी असे दोन दिवस या स्पर्धा होणार आहेत. तसेच महिला बचत गटासाठी खाद्य पदार्थ व इतर वस्तूंचे स्टॉल लावण्याची सुविधा आहे. तरी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक वर्षाताई विक्रमसिंह सावंत आणि मिनलदीदी सावंत-पाटील यांनी केले आहे.     कीर्तीमालिनी राजे डफळे या वस्तीगृहाच्या आवारात सायंकाळी ५ ते १० वाजेर्यंत रास दांडिया दोन विभागात संपन्न होणार आहे. पहिला विभाग ग्रुप दांडिया व दुसरा विभाग कपल दांडिया असा आहे. तसेच दांडिया स्पेशालिस्ट ऑर्केस्ट्राचे आयोजन आहे. विजेत्यांना कलाकारांच्या आयोजन बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जत शहरातील महिलांनी तसेच कपल्सनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान विक्रम फाऊंडेशनच्या संयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी नलिनी शिंदे ९६५७३७९१७७ आणि प्राची जोशी ८८३०७०७४०० यांच्याशी संपर्क साधावा.

धनश्री मल्टीस्टेट गोरगरिबांचा आधारवड; तुकारामबाबा महाराज

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क :     धनश्री मल्टीस्टेट संस्थेने अल्पावधीत सभासदांचा विश्वास संपादन केला असून ही संस्था सर्वसामान्य व गोरगरिबांचा आधारवड बनली आहे, असे प्रतिपादन श्री संत बागडेबाबा महाराज मठाचे मठाधिपती ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांनी केले.     जत शहरातील धनश्री मल्टीस्टेट संस्थेच्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यावेळी तुकाराम बाबा बोलत होते यावेळी संस्थेचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे, संचालक यदाप्पा माळी, मारुती सावंत उपस्थित होते. सहाय्यक निबंधक अमोल डफळे,  जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी यांनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.      तुकारामबाबा महाराज म्हणाले, जतची शाखा सुरू होऊन ११ वर्षे झाली. या काळात संस्थेत ३१ कोटीच्या ठेवी जमा केल्या आहेत. याचाच अर्थ या संस्थेने ग्राहकांचा व सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेत शिक्षित व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहेत संस्था पारदर्शक व्यवहार करीत असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. संस्थेत सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार एनईएफटी आरटीजीएस ची सुविधा करून

स्पर्धेतून खेळ व सांघिक खिलाडू भावना जिंकायला हवी; प्राचार्य डॉ.सुरेश पाटील

Image
राजे रामराव महाविद्यालय जत येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ जतवार्ता न्यूज नेटवर्क;     क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सांगली व राजे रामराव महाविद्यालय,जत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी राम फरकांडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अन्सार शेख, माजी क्रीडा शिक्षक प्रा. सिद्राम चव्हाण यांच्या हस्ते व राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. मैदान पूजनाने या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.     यावेळी स्पर्धेसाठी उपस्थित खेळाडू व संघ व्यवस्थापकांना  मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, स्पर्धा म्हणजे यश अपयश नव्हे तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द असते.  ही जिद्द उरात बाळगून आपण सर्व स्पर्धक उत्सवात सहभागी झालेले आहात. या स्पर्धेतून खेळ व सांघिक खिलाडू भावनाच विजयी झाली पाहिजे असे सांगून त्यांनी राजे रामराव महाविद्याल

जाडरबोबलाद येथे वंचित बहुजन आघाडीचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क;     वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार जत तालुक्यातील जाडरबोबलाद या गावी वंचित बहुजन आघाडीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष अमोल साबळे तसेच तालुक्यातून सर्वच शाखाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.      यावेळी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेला शेतकरी मेळावा, तसेच N.R.C.च्या विरोधात जत बंद करून प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती. जत बंदला मोठा प्रतिसाद मिळाला होता, तसेच बिलकिस बानू बलात्कार प्रकरणी त्यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढण्यात आला होता. गायरान जमिनीवरती असलेल्या अतिक्रमण कायमस्वरूपी त्यांच्या नावावर करून द्यावेत ही आमची रास्त मागणी सरकारने मान्य केली, असे अनेक जत तालुक्यातील विविध प्रश्नांवरती सर्वसामान्य जनतेचे हिताचे प्रश्न हे या प्रशासनाला व सरकारला वेळोवेळी निदर्शने, आंदोलने, रस्ता रोको, आमरण उपोषण करून वंचित बहुजन आघाडी ही पाठपुरावा करत असते म्हणून जत तालुक्याची सुज्ञ जनता ही या वि

राजे रामराव महाविद्यालय,जत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती संपन्न

Image
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त अभिवादन जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जगाला सत्य,अहिंसा,प्रेम व सहिष्णुतेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व जय जवान जय किसान घोषणा देऊन जगाच्या पोशिंद्याला व सैनिकांना सन्मान मिळवून देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त राजे रामराव महाविद्यालय,जत येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.      याप्रसंगी गांधींजीं व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे व कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव करेन्नवर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सतीशकुमार पडोळकर, सांस्कृतिक विभागातील प्राध्यापक, गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.