इशारा जनसुराज्यचा, जागे झाले प्रशासन!अभ्यासू नेतृत्वाचे प्रत्यक्ष परिणाम – बसवराज पाटील यांच्या इशाऱ्यानंतर एका दिवसात रस्ता दुरुस्तीला सुरुवात!

जतवार्ता न्यूज नेटवर्क; जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी डफळापूर ते एकुंडी रस्त्याची अत्यंत दयनीय व धोकादायक अवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्याची मागणी केली होती. "जर एका दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल", असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता. संबंधित विभागाने तात्काळ यंत्रणा सक्रिय करत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. जनसुराज्यचे नेते बसवराज पाटील यांच्या सारख्या ठाम व अभ्यासू नेतृत्वामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी बसवराज पाटील म्हणाले की, संघर्ष नसेल तर विकास अशक्य, आणि जबाबदारी घेतली की प्रशासनही हलते. आम्ही जो उठाव करतो त्या उठावाला जनतेतून थोडा जरी प्रतिसाद मिळाला तरी भविष्यात जत तालुक्याचा कायापालट करू, या रस्त्याची अडचण सर्व पत्रकारांनीही उचलून धरल्या बद्दल सर्व पत्रकारांचे व या रस्त्याचे काम ताबडतोब सुरु केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाटील यांनी आभार मानले.