भावी पिढीला राजश्री शाहू महाराजांच्या कार्याची ओळख होणे गरजेचे; प्राचार्य डॉ.सुरेश पाटील

जतवार्ता न्यूज नेटवर्क; आज समाजामध्ये जातीयवाद आणि धर्मवाद वाढत चालला आहे. मानवी मूल्यांचा ऱ्हास होत आहे होत आहे. मानवता नष्ट होणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक आहे. चांगल्या समाजासाठी, सामाजिक समतेसाठी राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची गरज आहे. राजश्री शाहू महाराजांच्या अफाट कर्तृत्वाची त्यांच्या मौलिक कार्याची आजच्या पिढीला माहिती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ.सुरेश पाटील यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यामंदिर हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, सलगर चे माजी प्राचार्य श्री. प्रतापराव शिंदे, प्रा.श्रीमंत ठोंबरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, छत्रपती शाहू महा...