सेवेला निवृत्ती नसते: प्रा. किसन कुराडे
डॉ. निर्मला मोरे यांच्या सेवागौरव समारंभाच्या निमित्ताने गौरवोद्गार जतवार्ता न्यूज नेटवर्क:- माणसाच्या आयुष्यात बालपण, तारुण्य, प्रौढावस्था व वृद्धापकाळ असे वेगवेगळे टप्पे असतात. नोकरीमध्ये दीर्घकालीन सेवा करूनही प्रत्येक टप्प्यात माणसाला काम करावेच लागते. याचे आदर्श उदाहरण म्हणून आपण शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याकडे पाहू शकतो. त्यांनी आयुष्यभर शिक्षणाची गंगा गरीब, वंचित व खेडोपाड्यातील मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्यभर सेवा केली. सेवेला निवृत्ती नसते. डॉ. निर्मला मोरे यांच्याकडूनही आयुष्यभर सेवा घडत राहिल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसन कुराडे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयात मराठीच्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. निर्मला वसंतराव मोरे यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या व सेवागौरव समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी प्रशासन सहसचिव प्राचार्य पुंडलिक चव्हाण, विद्यावाचस्पतीचे मार्गदर्शक डॉ. दत्ता पाटील, साहित्यिक जी. पी माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.