अण्णा भाऊ साठे यांना जत मध्ये अभिवादन
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त जत येथील महात्मा फुले नगरमध्ये त्यांच्या प्रतिमेस डी. पी.आय.चे जिल्हाध्यक्ष अविनाश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जतपरिषदेचे माजी नगरसेवक संतोष(भूपेंद्र) कांबळे, बाजी केंगार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अविनाश वाघमारे म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे महान शाहीर होते. खरे पाहता त्यांना शासनाने भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणे गरजेचे होते. उपेक्षित वंचितांना न्याय देण्याचे काम अण्णाभाऊंनी केले होते. त्यांच्या कार्याची दखल आज पर्यंत घेतली नाही ती घ्यायला पाहिजे. तसेच माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली हे गीत अण्णाभाऊंनी जगभर नेले असे मत व्यक्त केले. यावेळी बंडु कांबळे, सोनु कांबळे, अनंत वाघमारे, संतोष साबळे अशोक ऐवळे, ऋतिक कांबळे, दता हेगडे, विनोद हेगडे, राजु कांबळे, अजित वाघमारे, संतोष जतकर, पदम उमराणी, दर्याप्पा जतकर आदि उपस्थित होते.