Posts

Showing posts from August, 2025

ऊस बांधावर नारळ रोपांची लागवड | राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत कुंभारी येथे राबविण्यात आला उपक्रम

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजना व कृषी विभागामार्फत कुंभारी (ता. जत) येथे ऊस पिकाच्या बांधावर नारळ लागवड उपक्रम राबविण्यात आला.     या उपक्रमाचा शुभारंभ प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे व तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांच्या उपस्थितीत प्रगतशील शेतकरी माणिक आगतराव जाधव व कृष्णा आनंदा जाधव यांच्या उसाच्या बांधावर नारळ लागवड करण्यात आली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी शेगाव बी. डी. धडस, उपकृषी अधिकारी शेगाव ए. ए. भोसले, कुंभारी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी पी. बी. शिंदे, कुंभारी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. ज्योती जाधव, उपसरपंच अजित सूर्यवंशी, ग्रामरोजगार सहाय्यक सुरज कुमार भाते, पिक स्पर्धा विजेते शेतकरी व माजी सरपंच दाजी पाटील, बापू जाधव, सविता जाधव, महादेवी कदम, संभाजी कदम, कृष्णा जाधव आदी मान्यवर व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.     या योजनेत गावातील ५० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी २५ शेतकऱ्यांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. ११  शेतकऱ्या...

महाविद्यालयीन जीवन म्हणजे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी मिळालेली सुवर्ण संधी; डॉ.रवींद्र आरळी

Image
आर.आर.कॉलेजमध्ये सात दिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गाचे उद्घाटन जतवार्ता न्यूज नेटवर्क;        महाविद्यालयीन जीवन हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून ते व्यक्तिमत्व घडविण्याची खरी सुवर्ण संधी आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांत सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली चे संचालक व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.रवींद्र आरळी यांनी केले.         ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. भाग एक मधील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व उच्च शिक्षण प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे आजीव सेवक मा.कृष्णा बिसले, जत पदवीधर मतदार संघाचे समन्वयक प्रा.चंद्रसेन मानेपाटील,...

सक्तीच्या वर्गणी वसुली बाबत जत व्यापारी असोसिएशनची निषेध रॅली | पोलिसात तक्रार द्या कारवाई करू; पीआय कोळेकर

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;       जत शहरात वर्गणीच्या नावावर व्यापा-यांना धमकावून व शिवीगाळ करून वर्गणी गोळा करणा-यांवर पोलीस प्रशासनाने त्वरीत बंदोबस्त करावा या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवून संतप्त व्यापारीवर्ग रस्त्यावर उतरून शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कारवाई न केल्यास बेमुदत व्यापार बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार द्या आम्ही त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू असे सांगितले.      जत येथील व्यवसाईकांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली काही गावगुंड हजारो रूपयांची वर्गंणी वसूल करित असून वर्गणी न देणा-या व्यवसाईकांना धमकावणे व शिवीगाळ करणे या प्रकारामुळे व्यापारीवर्ग दहशतीखाली आहे. त्यातच ऑनलाईन व्यवसायांमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आल्याने शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधीकारी व कार्यकर्ते हे वर्गणीसाठी बाजारपेठेत फिरून व्यापा-यांकडून वर्गणी गोळा करू लागले आहेत. याचाच...

जत शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे देतायेत मृत्यूला आमंत्रण?

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचे खड्डे मृत्युला आमंत्रण देणारे ठरत आहेत. शहरातून जाणा-या या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने व या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने या मार्गावरून ये-जा करणा-या वाहनचालकांचा जिव धोक्यात आल्याने जत नगरपरिषदेने त्वरीत हे खड्डे मुजवावेत अशी मागणी वाहनधारक व शहरवासियांकडून करण्यात येत आहे.     या बाबत सविस्तर माहीती अशी कि, जत शहरातून जाणारा इस्लामपूर- चडचण हा राष्ट्रीय मार्ग असून एक दिड वर्षापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने जत शहरातून जाणा-या या रस्त्याचे डांबरिकरण केले होते. परंतु सद्या हे डांबरिकरण खराब झाले असून छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून वाहन चालवितांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.    खड्ड्यात पाणी भरल्याने एखादा मौठा अपघात होण्याची शक्यता असल्याने हे खड्डे ताबडतोब मुजविणे गरजेचे आहे. तसेच या मार्गावर इतरत्र...

जत घाटगेवाडी रस्त्याची दुरावस्था; अपघात झाल्यास जबाबदारी कोण?

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-     जत शहरातून जाणाऱ्या जत- घाटगेवाडी रस्त्याची अत्यंत वाईट दुरावस्था झाली असून रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कुंभार यांनी उपस्थित केला आहे.     जत ते घाटगेवाडी या रस्त्याची अत्यंत खराब अशी अवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे आपणहून अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच झाले आहे. या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजू खचल्या आहेत. विशेषत: श्रावण महिन्यात या रस्त्यावरून मोठी वर्दळ सुरू असते. श्री क्षेत्र गविसिध्देश्वर देवस्थानकडे जाण्यासाठी हजारो भाविकभक्त या रस्त्याचाच वापर करतात. दुधाळवस्ती इथपर्यंतच डांबरीकरण करण्यात आला असून तेथून पुढे घाटगेवाडी गावापर्यंत वाहनचालकांना रस्त्यावरून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यालगत मोठी नागरी वस्ती आहे.      जत पासून घाटगेवाडी हे अंतर सात कि.मी.असून या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. यापूर्वी हा संपूर्ण रस...

श्री संत बागडेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त राम चरितमानस कथेचे आयोजन | शनिवारी प्रारंभ; हभप तुकाराम बाबा यांची माहिती

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य वैराग्यसंपन्न श्री संत सद्गुरू बागडेबाबा यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्य चिक्कलगी भुयार मठ येथे श्री तुलसीदास कृत राम चरितमानस कथेचे आयोजन २२ ते २९ ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी सात ते दहा पर्यत आयोजित करण्यात आल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.     यावेळी दादा काटे महाराज, अमृत पाटील जाल्याळ, काशीराम चौगुले, रेवनसिद्ध मलाबादी, राजू चौगुले, शिवराय हाताळी, रामलिंग मेडीदार, भारत महाराज खांडेकर, वास्तुशास्त्र तज्ञ सरिता लिंगायत, युनिक अँडव्हरटायझिंगचे प्रशांत कांबळे उपस्थित होते.     श्री संत बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य दरवर्षी चिक्कलगी भुयार येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही  पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जालना येथील रामायण कथाकार हभप भगवानदास गोडसे यांच्या उपस्थितीत श्री तुलसीदास कृत राम चरितमानस कथा होणार आहे. २२ ...

सौ. सरिता पंडित यांची राज्यस्तरीय पाठ्यपुस्तक समीक्षक पदी निवड

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत येथील शिक्षिका सौ. सरिता पंडित यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे प्रकाशित इयत्ता दुसरीच्या ई-पाठ्यपुस्तक 'शिकू मराठी आनंदाने' या पुस्तकांच्या समीक्षकपदी निवड झाल्याने. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ.वैशालीताई सनमडीकर, उपाध्यक्ष विशाल जाधव, सचिव डॉ.कैलास सनमडीकर व भारत साबळे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.     तसेच मुख्याध्यापक के. श्यामसुंदर यांनी सौ. पंडित यांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि शैक्षणिक योगदानाचे मनापासून कौतुक करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले. यावेळी शैक्षणिक व सांस्कृतिक प्रमुख संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाने ही त्यांचे अभिनंदन व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बांधिलकीला नवे अधोरेखित स्वरूप मिळाले असून. सिद्धार्थ पब्लिक स्कूल परिवाराला या यशाचा मोठ...

मतचोरी ही देशद्रोहासमान; विक्रमसिंह सावंत | जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मशाल मोर्चा आंदोलन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     लोकशाही संरक्षणासाठी आणि मतदारांच्या सन्मानासाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मशाल मोर्चा आंदोलन करण्यात आले. शहरातील मार्केट यार्ड जत येथून मशालींच्या प्रकाशात, “मतदान चोर, खुर्ची सोड”, “लोकशाही वाचवा”, “घोटाळेबाजांचा निषेध असो” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. नागरिकांच्या हातातील मशालींनी जनआंदोलनाचा संदेश शहरभर पसरवला. हा कार्यक्रम सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.      यावेळी बोलताना ते म्हणाले की, "लोकशाहीची प्रतिष्ठा राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मतचोरी ही देशद्रोहासमान आहे, आणि यासाठी जबाबदार असणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही." मोर्चातील मान्यवरांची उपस्थिती या ऐतिहासिक मोर्चामध्ये शहर व तालुक्यातील शेकडो नागरिक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच काँग्रेसप्रेमी नागरिक सहभागी झाले. मोर्चाचा संदेश व निष्कर्ष ;     कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी य...

जतेत भारतीय स्वतंत्र दिवस विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत शहरासह तालुक्यात भारतीय स्वतंत्र दिवस विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ७९ व्या भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त जत येथील नविन प्रशासकिय ईमारतीसमोरील खुल्या जागेत असलेल्या ध्वजस्तंभावर येथील उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांच्याहस्ते मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.     यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यानी राष्ट्रगीत व गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत म्हंटले. जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावतीने त्यांच्या समर्थकांनी स्वतंत्रदिनानिमित्त शालेय विद्यार्थी व उपस्थितांना जिलेबीचे वाटप केले. यावेळी प्रशासनाच्यावतीने आमदार गोपीचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसिलदार प्रविण धानोरकर आदींच्या हस्ते जत तालुक्यातील स्वतंत्र सैनिकांचा व जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.     यावेळी महसूल नायब तहसीलदार बाळासाहेब सवदे, माजी सैनिक सिध्दू शिंदे, पंडीत कोळी, धोडमाळ, केंद्रीय सिमेंट कार्पोरेशन चे संचालक डाॅ.रविंद्रआरळी, आर.पी.आय.आठवले गटाचे प्रदेश सहसचिव संजय कांब...

अचकनहळ्ळी येथील श्री.बिसलसिध्देश्वर देवाची सोमवारी यात्रा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-      महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अचकनहळ्ळी येथील श्री.बिसलसिध्देश्वर देवाची यात्रा सोमवार दि.१८ ऑगस्ट रोजी भरविण्यात येणार आहे. जागृत व नवसाला पावणारे दैवत अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री.बिसलसिध्देश्वर देवाची यात्रा ही श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी भरविण्यात येते.      श्रावण महिन्यात दररोज पहाटे हजारो भाविकभक्तांच्या उपस्थितीत अभिषेक पुजा करण्यात येऊन नंतर देवाची आरती होते. व देवाला नैवेद्य दाखविला जातो. उपस्थितांना प्रसादाचे वाटप केले जाते. प्रत्येक श्रावण सोमवारी देवाच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर लोटतो.      यात्रेदिवशी पहाटे देवाचा रूद्राभिषेक करण्यात येणार असलेची माहीती पुजारी शिवशंकर कोरे, मनोज कोरे, चन्नाप्पा कोरे, उमेश कोरे, मल्लिकार्जुन कोरे, दिनेश कोरे यांनी दिली. दिवसभर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले असून यामध्ये धावण्याच्या स्पर्धा, सायकल स्पर्धा, जनावरे प्रदर्शन व निवड, धनगरी ओव्या स्पर्धा व कुस्तीचा आखाडा रंगणार आहे.  ...

जत येथे श्री.भाग्यवंती व मायाक्कादेवीचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प; बसवराज अलगुर महाराज

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत येथे श्री.भाग्यवंती देवी व श्री.मायाक्कादेवीचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प देवीचे पुजारी बसवराज अलगुर महाराज यांनी केला आहे. हे मंदिर उभारणी व धार्मिक कामी भाविकांनी मदत करावी असे आवाहन श्री.संत बागडे बाबा यांचे शिष्य व चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकारामबाबा महाराज यांनी केले.    जत येथिल छत्रपती शिवाजीमहाराज चौकाजवळच देवीचे मंदिर असून या मंदीराचे पुजारी बसवराज अलगुर महाराज व सुवर्णाताई अलगूर महाराज देवींची नित्य पूजा करतात. वर्षभर मंदिर समितीच्यामार्फतच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी गुडीपाडव्याला यात्रा भरविण्यात येते या प्रसंगी देवीच्या मूर्ती पालखीत ठेवून पालखीची सवाद्य मिरवणूक जत नगरीतून काढण्यात येऊन उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील श्री.क्षेत्र चिंचणी मायाक्का देवी यात्रेतील पालखीचा मान देवस्थान जतला दिला जातो.      सद्यस्थितीत मंदिर छोटे असल्याने निवासाकरिता दुसरीकडे जागा घेतली असून सद्या आहे ...

जतला भाजपचा पदग्रहण सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा

Image
जत शहर महिला आघाडी उपाध्यक्षपदी हेमलताताई चव्हाण जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने भव्य पदग्रहण सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. यामध्ये जत शहर, जत पूर्व मंडळ, जत पश्चिम मंडळ व जत दक्षिण मंडळ विभागानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस महिला मोर्चा, युवा मोर्चा इत्यादी पदांचे पदग्रहण करून सर्वांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.     पक्षाची विचारधारा, विकासाची दिशा आणि जनतेच्या अपेक्षा तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी संघटित, निष्ठावंत व एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. उत्साह, ऐक्य आणि बांधिलकीने भरलेल्या या मेळाव्यात भाजपा ज्येष्ठ नेते रवींद्र आरळी, सुभाष गोब्बी, संजय तेली, सोमन्ना हाक्के, विठ्ठल निकम, अण्णा भिसे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर हेमलता ताई चव्हाण म्हणाल्या की मी यापूर्वी जत नगरपरिषद नगरसेव...

जत येथे विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क ;     जत येथे विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विश्व आदिवासी दिनानिमित्त शहरातील आदिवासी पारधी समाजाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका व बांधकाम सभापती सौ. हेमलताताई बसवराज चव्हाण यांच्या पुढाकाराने झाले. त्यांच्यासह अनेक आदिवासी महिला यावेळी उपस्थित होत्या.      भगवान बिरसा मुंडा व भारतीय संविधानास वेगवेगळ्या माध्यमातून आदिवासी महिलांनी अभिवादन केले. आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि हक्क जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. उपस्थित महिलांनी आपल्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी आदिवासी पारधी समाजातील महिला भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.     यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे व प्रशासनातील अधिकारी यांनी आदिवासी पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण यांना आदिवासी दिनानिमित्त दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. 

राष्ट्रवादीचे नेतृत्व जनतेच्या पाठीशी; जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पूर्व जत दौरा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) वतीने जत तालुक्यात भव्य मॅरेथॉन दौरा पार पडला. या दौऱ्याला तालुक्यातील तिकुंडी येथून सुरुवात झाली. त्यानंतर गुलगुंजनाळ, करेवाडी (को.बो.), कागनरी, पांडोझरी, कोणबगी, कोंतेव बोबलाद,करेवाडी (तिकोंडी), या गावांमध्ये भेटी देत थेट ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.     गावभेटीदरम्यान शेतकरी, महिला बचत गट, बेरोजगार युवक यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. स्थानिक नागरिकांनी महागाई, शेतीमालाचे दर, अपुरी पायाभूत सुविधा, शिक्षण व नोकरीच्या संधींचा अभाव यांसारख्या गंभीर मुद्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी सरकारविरोधात जनतेचा तीव्र रोषही ठळकपणे दिसून आला.     या दौऱ्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जत तालुकाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक  मन्सूर खतीब, माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर होनमा...

भारतरत्न डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस शाश्वत शेतीदिन म्हणून साजरा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व जत तालुका कृषि पदवीधर औद्योगिक व कृषि पूरक सेवा सह. संस्था मर्या. जत यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस ७ ऑगस्ट हा तालुकास्तरीय "शाश्वत शेतीदिन" कार्यक्रम म्हणून तालुका कृषि अधिकारी कार्यालय जत येथे उत्साहात साजरा करण्यात आला.     यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे अध्यक्ष गणेश माळी यांनी डॉ एम.एस. स्वामिनाथन यांची ओळख व कृषि क्षेत्रातील त्यांचे भरीव योगदान व शाश्वत शेती याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी तालुका कृषि अधिकारी प्रदिप कदम यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती तसेच कृषि विभागाच्या विविध योजना याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.     या शाश्वत शेतीदिन कार्यक्रमात मिथिलेश मालानी, श्रीमती. गितांजली शिंदे व रोहित प्रधाने या प्रयोगशील शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शेती क्षेत्रातील कार्याचा आढावा घेऊन त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रविकिरण पवार यांनी...

निर्भया पथकाकडून सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क ;     जत येथील सिद्धार्थ पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा, गुन्हेगारी प्रतिबंधक उपाय आणि आत्मसंरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी निर्भया पथक यांचेकडून प्रभावी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्र सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळच्या अध्यक्षा डॉ. वैशाली सनमडीकर ,  व सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. शाळा समितीचे अध्यक्ष भारत साबळे सर यांचे मोलाचे सहकार्य आणि पाठिंबा याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य के. श्यामसुंदर सर यांचे प्रेरणादायी नेतृत्व महत्त्वाचे ठरले.     या सत्राचे आयोजन संस्कृतिक प्रमुख सौ. सरिता पंडित यांनी केले, तसेच शैक्षणिक समन्वयक सौ. रंजना शिंदे शिक्षक नागेश खजिरे, सौ. वर्षा पाटील आणि आयटी विभाग प्रमुख सौ. झीनत नाईक यांचेही सक्रिय सहकार्य लाभले. सत्रात अधिकारी समीर मुल्ला, यांनी सौ. पार्वती चौगुले आणि अजित मदने यांनी विद्यार्थ्यांना १०९८ (छेडछाड, पाठलाग), १०९१ (निर्भया पथक) आणि ११२ (मारामारी, आपत्कालीन परिस्थिती) या हेल्पलाइन क्रम...

जत येथे संत निरंकारी चँरिटेबल फौडेंशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २५१ जणांचा सहभाग

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क;      जत दिनांक ३ आँगष्ट २०२५ निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी चँरिटेबल फौडेंशन शाखा जत येथील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणी ज्युनियर काॅलेज जत येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये २५१ रक्तदात्यांनी उत्फुर्त सहभाग नोंदविला.       या शिबिराचे उद्घाटन संखच्या अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांचे हस्ते झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की रक्तदान शिबीराचे आयोजन करुन खऱ्या अर्थाने जण सेवेचे कार्य करित आहे. रक्तदान व आवयव दान यासारखे दान सर्वश्रेष्ठ दान आहे. अवयव दान केले नंतर आपला प्रत्येक अवयव कामाला येऊ शकतो अवयव दानाने आपण जिवंत राहू शकतो "मरावे परंतु किर्तीरुपी उरावे" या संताच्या वाक्यानुसार रक्तदान व आवयव दान केलेमुळे आपण अजरामर होऊ शकतो मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी या कार्यास शुभेच्छा दिल्या.      कार्यक्रमाच्या अध्यक्षीय विचारातुन बोलताना प्राध्यापक सुरेश पोळ म्हणाले की आध्यात्मिक जागृती बरोबर सामाजिक सेवेमध्येही रक्तदान शिबीर, स्...

माजी नगरसेवक साहेबराव कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त दत्त कॉलनी परिसरात वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम संपन्न

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:       काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय माजी नगरसेवक संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग जत शहरातील प्रभाग क्र.२, दत्त कॉलनी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी वृक्षारोपणासह सुशोभिकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.      कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या संदेशासह हा कार्यक्रम पार पडला. तसेच, या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेऊन, प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे आणि कॉलनीतील रस्त्यांचे नामकरण करण्यात आले, ज्यामुळे परिसराला एक नवी ओळख मिळाली. प्रभागातील गल्लीच्या सुरुवातीला रस्त्याचे नाव आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांची नावे असणारा फलक लावणेत आला.     यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी नगरसेवक संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या कार्यक्षमतेचे आणि समाजाप्र...

शेगाव येथील चोरीचा मुद्देमाल मुजावर कुटुंबीयांना जत पोलिसांकडून सुपूर्द

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत तालुक्यातील शेगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने सोने चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवार दि.७ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री घडली होती. या घटनेत सुमारे १ लाख ४४ हजार किमतीचे सोने चांदीचे दागिने लंपास झाले होते. याबाबतची फिर्याद मन्सुर बशीर मुजावर यांनी जत पोलिस ठाण्यात दिली होती.      या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे व त्यांच्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी कसून तपास करत या चोरीचा छडा लावला. या चोरीतील सर्व मुद्देमाल चोरट्याकडून जप्त केला असून. न्यायालयाच्या आदेशानुसार मुजावर यांना मुद्देमाल  ताब्यात देण्यात आला आहे.     यामध्ये ४५ हजाराचे नेकलेस , २५ हजाराचे  सोन्याचे मंगळसुत्र ,५० हजाराचे सोन्याचे टॉप्स,  २० हजारांच्या कानातील रींगा, ४ हजार ८०० रुपयांचे चांदीचे पैंजन असे एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी मुजावर यांच्या ताब्यात दिला. यावेळी मुजावर कुटुंबीयांनी जत पोलिसांचे आ...

श्री.क्षेत्र बिसल सिध्देश्वरांच्या दर्शनासाठी श्रावण सोमवारी लोटला भक्तांचा महापूर

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत निगडीरोडवर जत शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर अचकनहळ्ळी गावचे हद्दीत श्री.बिसलसिध्देश्वरांचे प्राचीन असे मंदिर असून हे जागृत तिर्थक्षेत्र मानले जाते.     बिसल म्हणजे उन उन्हातील सिध्दपुरूष म्हणून श्री.बिसलसिध्देश्वरांकडे पाहीले जाते. या ठिकाणी श्री.सिध्देश्वरांनी तप करून सिध्दी प्राप्त केल्याने या तिर्थक्षेत्राला फार मोठे महत्व आहे. श्रावण महिन्यात दररोज पहाटे अभिषेक पूजा, त्यानंतर सकाळी सव्वा सहाला महापूर आरती व त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना फराळ वाटप असे दैनंदिन धार्मिक विधी पार पाडले जातात. दर्शनासाठी श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविकभक्त मोठी गर्दी करतात. आजही हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.  श्री.बिसलसिध्देश्वरांची पूजा ही शिवशंकर कोरे,मनोज कोरे,चेन्नईच्या कोरे,उमेश कोरे,मल्लिकार्जुन कोरे,दिनेश कोरे यांच्यामार्फत श्रावण महिन्यात नित्य पार पाडली जातो.    पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविक-भक्त पायी चालत दर्शनासाठी येतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी होती. जत निगडीरोडवर दुचाकी, चारचाकी वाहनाबर...

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

Image
जत येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक उत्साहात संपन्न जतवार्ता न्यूज नेटवर्क:      जत येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष्याच्या वतीने एक महत्वपूर्ण बैठक पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाबरोबरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यात आली.     या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर युवकांशी थेट संवाद साधून नवीन शाखा स्थापन करणे, सक्रिय कार्यकर्ते तयार करणे, तसेच गाव ते शहर अशा सर्व स्तरांवर पक्षाचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात आला.     बैठकीस तालुका अध्यक्ष सचिन होर्तीकर, कार्याध्यक्ष विश्वजित सुर्यवंशी, राजेसाहेब डफळे, नजीर पटेल, श्रीधर हिरगोंड, महादेव बगली, संतोष शिंदे, सागर लट्टी, सुरेश मधभावी, तानाजी शिंदे, राजकुमार आमगौडर, चंद्रकांत माशाळ, अमसिद्ध पुजारी, इम्रान गवंडी आणि संजय कराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.     बैठकीत युवकांचा...

डफळापूर येथील आपलं धन पतसंस्थेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

Image
मोफत डोळे तपासणी शिबिर व विविध कार्यक्रम संपन्न जतवार्ता न्यूज नेटवर्क;     डफळापुर येथील आपलं धन पतसंस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सुदर्शन हॉस्पिटलचे डॉ. वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे श्री अमोल डफळे हे उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते या डोळे तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचा लाभ परिसरातील अनेक रुग्णांनी घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, डफळापुर येथील आपलं धन सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच चांगली प्रगती केली आहे. इथून पुढच्या काळातही या पतसंस्थेकडून ठेवीदारांना आकर्षक व्याजदरातून चांगला फायदा मिळवून देतील यात शंका नाही. यावेळी डफळापूरचे सरपंच, गावातील उद्योजक, व्यापारी व राजकीय मंडळी उपस्थित होते. डोळे तपासणी शिबिरात डपळापूर परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने जत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क :      सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (रजि.) दिल्ली, शाखा जत यांच्या वतीने रविवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी श्री.एस.आर.व्ही.एम्. हायस्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज जत येथे सकाळी ठीक ९ ते सायं. ६ या वेळेत विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.     सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्तसंकलन सांगली सिव्हिल व मिरज सिव्हिल येथील रक्तपेढी यांच्यामार्फत करण्यांत येणार आहे. संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदान शिबिराची ही शृंखला २३ ऑक्टोबर १९८६ पासून सुरू झाली असून दरवर्षी २४ एप्रिल रोजी मानव एकता दिवस या दिवसापासून संपूर्ण विश्वात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते, याच अनुषंगाने जत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.     संत निरंकारी मंडळाचा रक्तदानाचा हा सामाजिक पैलू मनुष्यमात्राच्या मनामध्ये मानवतावादी भावनांना उद्योन्मुख करत आहे. तरी रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान या महान मानवी कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्थानिक जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे से...